मुरूम / प्रतिनिधी

 येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्राचे संचालक ब्रह्मकुमार राजुभाई भालकाटे यांच्या मातो:श्री अनुसयाबाई भालकाटे  यांच्या १३ वा एक दिवशीय योगभट्टी व भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम प्रभुप्रसाद केंद्रात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोलापूर उपक्षेत्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी सोमप्रभा दीदी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम मंगळवारी (ता. १७) रोजी पार पडला. यावेळी तुळजापूरच्या स्मिता बहनजी, उस्मानाबादच्या कृष्णाबहन, भाजपच्या व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिणियार, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत बाबरे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, सोलापूरचे रेवनसिद्ध भाई, उस्मानाबादचे  सुरेशभाई जगदाळे, गुलाब डोंगरे, माजी प्राचार्य शिवानंद दळगडे, काशीनाथ मिरगाळे, रोटरीयन सतिश साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती.                                    

ब्रह्माकुमारी राजयोगिनी सोमप्रभा दीदी यावेळी श्रध्दा पुष्प अर्पण करताना म्हणाल्या की, माणसाचे त्यांच्या अंगी असणारे पवित्र विचारच जीवनात श्रेष्ठ शक्ती प्राप्त करुन देतात. माता अनुसया यांनी त्यांच्या जीवनात आचरणातून सुख, समाधान व शांती प्राप्त करू घेतली. त्या नव्वद वर्षापेक्षा अधिक काळ जगल्या आणि जीवनात यशस्वी झाल्या. आता मातेचा सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहतील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर मातेची आठवण सातत्याने येत राहील. त्यांच्या अंगी असणाऱ्या विविध गुण वैशिष्टयामुळे त्या आदर्शवंत होत्या. त्यांचे विचार आपण जोपासले पाहिजेत. दुःखों की दुनिया को भूलना हैं I तो ओमशांती परिवार में सदा खोये रहो I असा संदेश त्यांनी शेवटी यावेळी दिला. याप्रसंगी राजू मिनियार, नितीन डागा, वसंत बाबरे, महेश मोटे, सुरेश जगदाळे आदींनी भावपूर्ण श्रद्धांजलीपर आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रारंभी भावसुमनपर मधुरगीत कमल शेवाळे यांनी गायले. रतनभाई पटेल, अनिता मिरकले, वैष्णवी दीदी, सविता भरदाळे आदींनी पुढाकार घेतला. शासनाच्या कोरोना नियमाचे पालन करून मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवून हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातून विविध माता-भगिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन लोहार सेवाकेंद्राच्या संचालिका सरिता बहनजी तर आभार राजुभाई भालकाटे यांनी मानले.   

 
Top