तुळजापूर / प्रतिनिधी-

माजी मंत्री तथा विधान परिषद उस्मानाबाद,लातुर,बीड मतदार संघाचे आमदार श्री सुरेश आण्णा धस यांची तुळजापूर नगर परिषदेत शनिवार दि.१८रोजी  विकास कामाबाबत आढावा बैठक घेतली.

सकाळी तुळजाभवानी मातेचे बाहेरील गेट पासुन दर्शन व विधीवत पुजा करण्यात आली. नंतरण श्री तुळजा भवानी मंदीर समीतीच्या वतीने त्यांचा सत्कार नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केला.  त्या नंतरण ते नगर परिषद कार्यालयात ९ वाजता दाखल झाले पालिकेत सीओ राठोड  ,ओ एस श्री पाठक सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तुळजापूर शहर तसेच हद्दवाढ भागाच्या नकाशाचे माहीती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी आमदार धस यांना दिली.

 कोरानोच्या पार्श्वभुमीने तुळजापूर शहरवासियांन साठी आ धस साहेबांनी आँक्सिजन काँनस्र्टेटर मशीन नगर परिषदकडे दिली. या प्रसंगी शहरातील विविध विकास कामाबाबत सकारात्मक चर्चा झाली. सदरील प्रसंगी सीओ राठोड, कार्यालयीन अधीक्षिक वैभव पाठक,  युवा ऩेते विनोद गंगणे, नगरसेवक पंडीतराव जगदाळे,अमर मगर,विजय कंदले,सचिन पाटील,किशोर साठे,अविनाश गंगणे,औदुंबर कदम,सुनील रोचकरी,बापु कणे,विशाल रोचकरी,माऊली भोसले,सौ मंजुशातई देशमाने आदी उपस्थित होते.

 
Top