कळंब / प्रतिनिधी-

 येथील देवी रोड वरील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सभागृहात माझी शिधापत्रिका माझा हक्क या शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन सदरील शिबीर दोन दिवस चालणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शासकीय योजणेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी केले. 

या दोन दिवस चालणाऱ्या शिबिराचे उद्घाटन कळंब च्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार रोहन शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे जिल्हा प्रतिनिधी संजय होळे, अदी मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रजलंन करून करण्यात आले यावेळी  नायब तहसीलदार पुरवठा विभाग चे निलेश काळे, नायब तसहलीदर मुस्तफा खोंदे, मंडळ अधिकारी मडके टि. बी., पुरवठा विभाग चे शिंदे साहेब, अव्वल कारकून गायकवाड एन. एल., साहाय्यक पुरवठा कर्मचारी लोकरे एन. एन., संगणक विभागचे आडसुळ आणि झोंबाडे अदी शासकीय कर्मचारी उपस्थित होते. तसेच कळंब शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार देखील उपस्थित होते. यावेळी वरिल मान्य वराच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात काही जंनाना दुय्यम शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. कळंब शहरातील अनेक नागरिकांना  शिधापत्रिका नाहीत तसेच नवीन रेशन कार्ड काडणे, नाव कमी करने, दुरुस्ती करने, आशा कामासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात जावे लागते येथे त्यांना अनेक अडचणी चा सामना करावा लागतो त्यामुळे काही वेळा काम न होतास त्यांना हाताश होऊन परत जावे लागत असल्याने अनेक गोर-गरिब लोकांना धान्यापासून तसेच अनेक शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागत आहे हाच परस्पर हेतु डोळ्यासमोर ठेऊन कळंब शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे यांनी माझी शिधापत्रिका माझा हक्क या शिबीराचे दोन दिवस शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबिरात पहिल्या दिवशी खुप मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला दिसुन येत आहे. 

हे शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सागर बाराते, शहरप्रमुख प्रदीप मेटे, उपशहरप्रमुख अजित गुरव, अॅड मंदार मुळीक, युवा सेनेचे गोविंद चौधरी,  शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यां रुकसाना बागवान, गजानन चौंदे, विशाल यादव, अनिल पवार, नितीन गरड, हर्षल अंबुरे, भैय्या खंडागळे अदी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

 
Top