परंडा / प्रतिनिधी : -

सत्तेचा गैरवापर करुण भाजपा नेते नारायण राणे यांच्या वर सुडबुद्धीने कारवाई करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची सत्ता बरखास्त करु महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपा युवामोर्चाचे परंडा तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांनी गुरुवार दि.२६ रोजी येथील तहसीलदार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

     शार्दुल उस्मानी सारखी देशविघाटक लोक महाराष्ट्रात येऊन दोन जातीधर्मात तेढ निर्माण करण्याची वक्तव्य करतात त्याच्यावर मागणी करुनही कोणतीही कारवाई होत नाही. याऊलट कारवाईची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात.सत्तेत आसणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांकडून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडविण्याच्या हेतूने भाजप कार्यालयांवर भ्याड हल्ले केले जातात हे सरकार माञ मुग गिळून हुकूमशाही पद्धतीने सत्ता चालवत आहे.

    तसेच वरुण सरदेसाईसारखा युवा सेनेचा नेता पोलिसांना शिव्या घालतो राणे यांच्या वर कारवाईची तत्परता दाखवणारे राज्य सरकार सरदेसाई विषयी तशीच कायदेशिर कारवाई का करत नाही असा ही संतप्त सवाल तालुकाध्यक्ष  अनिल पाटील यांनी या निवेदनाद्वारे सरकारला विचारला आहे.

 दिलेल्या निवेदनावर भाजपा युवानेते संकेतसिंह ठाकुर, युवा मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब गोडगे, जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, परंडा भाजपा युवा मोर्चाचे ता.सरचिटणीस अरविंद रगडे, ता.उपाध्यक्ष राहुल जगताप, सारंग घोगरे, अजित काकडे, धनंजय काळे, अविनाश विधाते, आकाश देवकर, सुरज काळे, शिवानंद तळेकर, विनोद पाटील, शरद कोळी, भाग्यद्योय देशमुख आदीच्या स्वक्षऱ्या आहेत. 

 
Top