परंडा प्रतिनिधी : - जगातील ग्रंथालय शास्त्रांमध्ये सर्वात मोठी ग्रंथसंपदा असणारी व्यक्ती म्हणजे डॉ. एस आर रंगनाथन असे प्रतिपादन प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.  येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयांमध्ये सोमवार दिनांक १२ रोजी डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या जयंती व ग्रंथपाल दिनानिमित्त डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेसअभिवादन करून प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.  

        यावेळी ग्रंथपाल डॉ.राहुल देशमुख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सांस्कृतिक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रम घेण्यात आला.  यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे ,डॉ विशाल जाधव, डॉ संभाजी गाते ,डॉ. बी.वाय.माने, डॉ.अक्षय घुमरे ,डॉ.कृष्णा परभणे, डॉ. प्रशांत गायकवाड ,प्रा संतोष भिसे, प्रा.दत्ता मांगले, प्रा.दीपक हुके, कार्यालयीन कर्मचारी बाबासाहेब क्षिरसागर, जयवंत देशमुख ग्रंथालयातील कर्मचारी बबन ब्रह्मराक्षस आदी कोव्हीड -१९ चे पालन करित कार्यक्रम आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 
Top