परंडा / प्रतिनिधी :-

 कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२१-२२ रानभाजी महोत्सव गुरुवार दि.१२ रोजी तालुक्यातील सोनगिरी येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला. 

रानभाजी महोत्सव विषयी कृषी अधिकारी  महारूद्र मोरे यांनी सविस्तर मार्गदर्शन करताना आपल्या शेतातील रान भाज्या करटोली, पाथरी, आळु, केना, बांबु, कपाळफोडी, कुरडू, आघाडा, चिवळ, अंबाडी, पिंपळ, कवट, विविध शेंद्रिय रानभाजी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच कृषी विज्ञान केंद्र चे गणेश मंडलिक यांनी रानभाजी व किसान गोष्टी चे महत्व पटवून देऊन गुळलेल, आवळा, घोळ, तांदुळजा, तरवट आणि फळलागवड विषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच वाॅटर संस्था चे गिते यांनी पुर्वजनांच्या शेती विषयी शक्तीवर्धक रानभाज्या चे गुणधर्म पटवून देण्यात आले.पंचायत समिती परंडा चे सभापती अनुजा दैन यांनी शेतकरी यांना रानभाजी महोत्सव विषयावर बोलताना नैसर्गिकरीत्या शेतामध्ये उगवलेल्या विष मुक्त रानभाज्या चा आवर्जून आस्वाद घेत राहावे व शरीर तंदुरुस्त ठेवावे तालुका स्तरीय महोत्सव गावा गावात होवो अशी सुचना उपस्थितांना दिला. 

यावेळी प.स.चे सभापती श्रीमती अनुजा दैन, तहसीलदार सुजित वाबळे, कृषी अधिकारी  महारूद्र मोरे, मंडळ कृषी अधिकारी कैलास देवकर, केव्हीके चे गणेश मंडलिक, मंडळ कृषी अधिकारी एम.तावरे, पाणी फाऊंडेशन चे गिते, आत्मा चे व्यवस्थापक अमोल पाटील, कृ.स.अ.नलवडे, प्रगतशील शेतकरी विकास थिटे लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, शेतकरी गोपाळ लिमकर, लघुउद्योग सल्लागार गणेश चव्हाण, कृ.स. श्रीमती गवळी, सरपंच अमीर शेख, चंद्रकांत कापसे, कृषी सहाय्यक व कृषी विभाग कर्मचारी आणि परंडा तालुक्यातील शेतकरी मिञ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कांबळे व्ही.बी. यांनी तर आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी कैलास देवकर यांनी मानले.

 
Top