उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण व संस्कारातून, मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यभर घेण्यात येत असलेल्या शिवसंपर्क अभियानांतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील सांजा, चिखली, बेंबळी, केशेगाव, उमरेगव्हाण, करजखेडा येथे पंचायत समिती गणांतील शिवसैनिक, युवासैनिक, ग्रामस्थांशी यांच्याशी संवाद साधत आमदार कैलास पाटील यांनी अडचणी जाणून घेतल्या.

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेली व होत असलेली विकासकामे समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याचे काम संघटीत होवून करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच समाजातील विविध घटकांसाठी सरकारने सुरू केलेल्या योजनांचा नागरिकांना लाभ मिळण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन त्यांनी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिकांना केले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, माजी तालुकाप्रमुख दिलीप जावळे, माजी शहरप्रमुख प्रवीण भय्या कोकाटे, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे, विजय राठोड, तुळजापूर विधानसभा संघटक पांडुरंग माने, युवासेना तालुकाप्रमुख वैभव वीर, शिव अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाध्यक्ष अमीर शेख, भीमा अण्णा जाधव, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन खान, उपतालुकाप्रमुख किरण चव्हाण, विभागप्रमुख अमोल मुळे, धनंजय इंगळे, सौदागर जगताप, मुकेश पाटील, दीपक पाटील, युवासेना विभागप्रमुख ओंकार आगळे, स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना पदाधिकारी, युवा सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top