उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्याचे राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार अपंग क्रांती आंदोलन उस्मानाबादच्या वतीने मौजे आरणी,ता.जि उस्मानाबाद येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन उस्मानाबादच्या 96 व्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. 

प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले, आरणी शाखेच्या अध्यक्षपदी श्री हनुमंत चव्हाण,उपाध्यक्षपदी बंडू शिंदे तर सचिवपदी संजय पठाण यांची नियुक्ती करण्यात आली  . 

यावेळी प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष नवनाथ मोहिते,उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,बाबासाहेब भोईटे, जमीर शेख, दादासाहेब अकोसकर,नवनाथ कचार, दिनेश पोतदार,सबदार सय्यद,रामा अडसूळ,शिवाजी पोतदार, दत्ता शितोळे,इरफान वस्ताद,कैलास लाखपते व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top