उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबादच्या वतीने दि. १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतच्या निमित्ताने पक्षकार विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश  श्री.के. आर पेटकर यांच्या हस्ते  मास्कचे वाटप करण्यात आले. 

यावेळी जिल्हा न्यायाधीश श्री नेर्लेकर, श्रीमती मखरे ,बार कॉउन्सिल महाराष्ट्र सदस्य अँड .मिलिंद पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमती चारुशीला देशमुख, जिल्हा सरकारी वकील अँड शरद जाधवर, जिल्हा विधी मंडळाचे अध्यक्ष अँड नितीन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

 या N 95 मास्क साठी  जिल्हाधिकारी दिवेगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक श्री पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.यावेळी एकूण पाच हजार N95 मास्कचे वाटप करण्यात आले . यावेळी विधीज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष अँड अतुल देशमुख,अँड के बी डेंगळे, सचिव अँड तानाजी चौधरी, कोषाध्यक्ष अँड . भाग्यश्री कदम, सहसचिव ऍड.  प्रवीण शेटे, ऍड. अरुणा गवई, महिला प्रतिनिधी ऍड आकांशा माने,ऍड अश्विनी सोनटक्के व वरिष्ठ विधिज्ञ, पक्षकार उपस्थित होते.

 
Top