उस्मानाबाद / प्रतिनिधी : - 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मा.उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी   उस्मानाबाद तालुक्यातील जुनोणी येथे बैठक घेवून ग्रामस्थांशी संवाद साधला. बैठकीत ग्रामस्थांनी गावातील प्रश्न व समस्या मांडल्या. त्या सोडवण्यासाठी सौ. अर्चनाताई पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचना दिल्या.

श्रीसंत गोरोबाकाका पालखी मार्ग, जुनोनी ते सोलापूर जिल्हा सरहद्द रस्ता तसेच शेतकरी बांधवांसाठी आवश्यक असलेला जुनोनी ते कौडगाव (बा.) हे रस्ते करण्याबाबत नागरिकांनी सांगितले. सदरील कामे पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल ,असे आश्वासन यावेळी सौ. अर्चनाताई पाटील दिले. तसेच गावात कोणतीही अडचण अथवा समस्या असल्यास यापुढे देखील संपर्क करण्याचे आवाहन केले.

यावेळी श्री.नागनाथ पाटील, श्री.रहीम शेख, श्री. बुबा गवळी,  श्री.मौला शेख, श्री.मुख्तार शेख व गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top