उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्याचे नेते आ.सुजितसिंह ठाकूर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ तालिबानी वृत्तीच्या, तुघलकी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बुधवार दि. २५ ऑगस्ट रोजी निर्दर्शने करत घोषणा देण्यात आल्या.

 निदर्शने केल्या नंतर जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकार मधील भ्रष्ट नेते मंडळी गंभीर गुन्हे करुन देखील मोकाट फिरत असल्याचा घणाघाती आरोप केला.

यावेळी भाजपचे पदाधिकारी दत्ताभाऊ कुलकर्णी, सुधीर पाटील, ॲड.खंडेराव चौरे, ॲड. नितीन भोसले, राजसिंह राजेनिंबाळकर, राजाभाऊ पाटील, रामदास कोळगे, सुनील काकडे ,प्रवीण सिरसाठे, अभय इंगळे ,प्रवीण पाठक, संजय लोखंडे, बालाजी गावडे ,पांडुरंग लाटे ,संदीप कोकाटे, विनोद गपाट, विनायक कुलकर्णी, नामदेव नायकल, अमोलराजे निंबाळकर, विनोद निंबाळकर, ओमप्रकाश मगर, नीलकंठ पाटील, अभिराम पाटील, राहुल शिंदे, ओम नाईकवाडी, गणेश एडके, हिम्मत भोसले, प्रीतम मुंडे, विजय हौळ, शहाजी वाघ, सुरज शेरकर, वैभव हांचाटे, गणेश देशमुख, गणेश इंगळगी, विशाल पाटील, अजय यादव, राज निकम, प्रेम पवार, मेसा जानराव, संदीप इंगळे, गणेश मोरे, अमित कदम, सुनील पांगुडवाले, गिरीश पानसरे, सागरसिंह ठाकूर, सागर दंडणाईक, तेजस सुरवसे, कमलाकर दाणे, तसेच उस्मानाबाद शहर व ग्रामीण भागातील भाजपचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top