परंडा प्रतिनिधी : - भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष संयमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाशीक येथे केलेल्या बेताल वक्तव्याचा परंडा तालुका शिवसेना च्या वतीने आंदोलन व जाहिर निषेध करून येथील तहसिलदार यांना मंगळवार दि.२४ रोजी निवेदन देण्यात आले.

 परंडा तालुका शिवसेनेच्या वतीने तहसिल कार्यालयाच्या परिसरात भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करून राणे यांच्या वर योग्य ती करावी अशी मागणी केली.

      यावेळी जिल्हा प्रमुख गौतम लटके सर व जिल्हापरिषद सभापती दत्ता (अण्णा) साळुंके यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तीव्र शब्दात प्रतिक्रिया देत जाहिर निषेध केला.

   दिलेल्या निवेदनावर शिवसेना जिल्हाध्यक्ष गौतम लटके सर, जिल्हा समन्वयक दत्ता साळुंके, जिल्हा संघटक मेघराज पाटील,शिवसेना नेते समीर पठाण, शहर प्रमुख बाळासाहेब गायकवाड ,दत्ता रणभोर महाराज,सतीश मेहेर, युवासेना प्रमुख वैभव पवार, उमेश परदेशी, रमेश गरड ,कुणाल जाधव,नवनाथ बुरुंगे, मारुती बारस्कर, सत्यजित जाधव आदी शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top