उमरगा / प्रतिनिधी-

 भाजपच्या वतीने उमरगा तहसील कार्यालयात  केंद्रिय कॅबिनेट मंत्री नारायण राणे  यांच्यावर मोघलाई पद्धतीने गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. नियमांची पायमल्ली करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तिव्र निषेध तसेच मुख्यमंत्र्यांवर राष्ट्रदोषाचा गुन्हा दाखल करावाया साठी बुधवारी निवेदन देण्यात आले.

    निवेदनात, १५ ऑगस्ट रोजी मा . मुख्यमंत्रीनी भाषण करताना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा उल्लेख हिरक महोत्सव असा केला . आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिनाला किती वर्षे झाले हे माहित नसणे व तसे जाहीरपणे बोलणे लांच्छनास्पद आहे. मुख्यमंत्री पदाचा गरीमा धुळीला मिळवण्याचा प्रकार फुले - शाहु आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घडला. याच मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणात भाजपनेत्यांना झापड लगवाण्याची भाषा केली होती. त्यांच्यावर कोणतीही कारवाही करण्यात आली नाही. परंतू केंद्रिय कॅबिनेट मंत्री  नारायण राणे जेव्हा जनआशीर्वाद यात्रेला निघाले त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भ्रष्टाचारने बरबटलेल्या महाआघाडी सरकारने राणे यांच्या एका वक्तव्याचा गैरअर्थ घेवून त्यांच्यावर सुडबुद्धीने विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच त्यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता मोघलाई पद्धतीने अटक करण्यात आली.  राणे  केंद्रिय मंत्री असल्याने त्यांच्या सोबत राज्य सरकारने सर्व नियमांची पायमल्ली करत अपमानास्पद वागणूक दिली . त्यामुळे या आघाडी सरकारचा तिव्र जाहीर निषेध आसे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 निवेदन देताना भाजप कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, तालुका अध्यक्ष कैलास शिंदे, तालुका सरचिटणीस अनिल बिराजदार, महिला तालुकाध्यक्ष सुलोचना वेदपाठक, श्रीकांत मणियार, जयवंत कुलकर्णी, पंकज मोरे, प्रदीप सांगवे,दिलीप गौतम, गुलाब डोंगरे, धर्मराज जाधव आदी उपस्थित होते.

 
Top