उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तेर येथील उत्खणनातील बौध्द स्तुप परिसरात उस्मानाबाद येथील कालकथित दशरथ गजधने यांच्या स्मरणार्थ फुलांची रोपे व फुलांच्या कुंड्याचे धम्मदान गजधने परिवाराच्या वतीने करण्यात आले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ऐतिहासिक असे गाव असुन बौध्द धम्माचा इतिहास येथील भुमीत दडलेला आहे.उत्खणन करतांना आजही येथे बौध्द धम्माशी संलग्नित वास्तु व वस्तु आढळतात,बौद्ध स्तुप हे त्यातीलच एक साक्ष होय.बौध्द स्तुप परिसरातील स्वच्छता आणि फुले झाडे,पत्र्याचे शेड, गवत व इतर शोभीवंत बाबी पासुन हा परिसर सुंदर केला आहे तो तेर येथील सुमेधजी वाघमारे यांनी, त्यांच्या सोबतीला अमोल सावंत व इतर समाज बांधवांच्या परिश्रम व सहकार्याने येथील परिसर निसर्गरम्य झाला आहे.गरज राहील वास्तवतेची सर्व समाज बांधव,लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून येथील परिसर आणखी फुलला जाणार आहे.फुलांची रोपे व फुलांच्या कुंड्याचे धम्मदान करतांना सुमेध वाघमारे,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने, अमोल सावंत,गजधने व वाघमारे परिवार..

 
Top