उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सी.एफ.आय.) या कोचिंग क्लास संचालकांच्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संघटनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी नुकतीच पुणे येथे जाहीर करण्यात आली. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन चे प्रा. रवी शितोळे यांची स्टेट ऍडव्हायझर व डॉ. आनंद मुळे यांची स्टेट जॉईंट सेक्रेटरी या पदावर नियुक्ती करण्यात आली. 

पुणे येथे झालेल्या मिटिंग मध्ये महाराष्ट्रातील प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पीटीए), महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन (एमसीओए) मुंबई, कोचिंग क्लास प्रोप्रायटर्स असोसिएशन (सीसीपीए) ठाणे, असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट्स (सीसीआय) नागपूर, असोसिएशन ऑफ कोचिंग क्लास ऍण्ड मेंटर्स (एमसीसीओएम) मुंबई, कोचिंग क्लासेस असोसिएशन (सीसीए) औरंगाबाद या सहा संघटनांनी कोचिंग क्लास संचालकांच्या हितासाठी एकत्र येऊन कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेशी लिखित सामंजस्य करार केला. कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या कोचिंग क्लास संचालकांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सीएफआय मार्फत अल्पदरात कर्जपुरवठा, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, कालानुरूप बदलण्यासाठी तांत्रिक साहाय्य देण्याच्या योजना जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रा. रवी शितोळे व डॉ. आनंद मुळे यांनी दिली.

पुणे येथील मिटिंग साठी सीएफआयचे प्रेसिडंट सौरभ कुमार, जनरल सेक्रेटरी आलोक दीक्षित, अनुप मिश्रा, डॉ. प्रशांत कुलकर्णी, प्रवीण ठाकूर व सीएफआय चे स्टेट प्रेसिडंट विजय पवार यांची उपास्थिती होती.

 
Top