उमरगा / प्रतिनिधी-

 अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व विधिज्ञ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि १) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत विविध स्वरूपाच्या एक हजार 568 प्रकरणा पैकी 157 प्रकरणी  तडजोडी अंती संबंधिताना दोन कोटी 66 लाख 62 हजार 820 रुपये देण्याचे आदेश देण्यात आले यात आठ हजार 900 रुपये शासनाकडे दंडाची रक्कम शासनास भरणा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाच्या आवारात रविवारी  झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत सहा पॅनल तयार करण्यात आले होते, त्यात उमरगा येथील जिल्हा न्यायधिश डी. के. अनभुले, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्रीमती मनीषा चराटे, सहदिवाणी न्यायाधीश एम. टी. बिलाल, सह दिवाणी न्यायाधिश वरिष्ठस्तर सौ एस. एम. कानशिडे, सहदिवाणी न्यायाधिश एम. टी. बिलाल, सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. चव्हाण, तिसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ए. डी. पाटील  यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. दिवसभर चाललेल्या न्याय निवाड्यात विविध प्रकरणातील भूसंपादन, धनादेश, कौटुंबिक, मोटार अपघात, दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे वाद अशी 1019 तर दावापुर्व स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक, महिंद्रा फायना न्सची 549 प्रकरणे असे एकूण 1568 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. दिवाणी व फौजदारी स्वरूपातील 157 प्रकरणात तडजोड करून दोन कोटी 66  लाख 62 हजार 820 इतक्या रक्कमेत तर दावापुर्व 569 प्रकरणापैकी 18 प्रकर णात पाच  लाख 79 हजार 300 इतक्या रक्कमे त तडजोड झाली. एकूण 1568  विविध प्रकरणात तडजोड होवून संबंधिताना दोन कोटी 66 लाख 62 हजार 820 रुपये संबंधितास देण्याचे निश्चित करण्यात आले. पोलीस निरीक्षक मुकुंद अघावं यांनी चोख बदोबस्त ठेवला होता. न्यायालयाच्या परिसरात गर्दी होऊ नये म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांची हजेरी लावली होती.

या वेळी विधिज्ञ मंडळ अध्यक्ष ॲड. दिलीप सगर, ॲड. व्ही. एस. आळंगे, ॲड. उध्दव भोसले, ॲड. एस पी इनामदार, ॲड. एम. आय. येळीकर, ॲड. एस. बी. हंद्राळे, ॲड. एन. बी. माळी, ॲड सौ. एन. के. जोशी, ॲड मल्हारी बनसोडे, ॲड. ए. के. हेडे, ॲड पी आर देशपांडे, ॲड सौ. एस. एस. सुरवसे, ॲड एस. एम. दामावले, ॲड. राजू इंगळे, ॲड एस. टी. बिराजदार, ॲड जी के गायकवाड, ॲड. एम. एस. कोडलंगरे, ॲड. जे .जी. मुजावर यांच्यासह विधिज्ञ मंडळी यांनी राष्ट्रीय लोक अदालतीच्या कामकाजात सहभाग घेतला.


 
Top