उमरगा / प्रतिनिधी-

तालुक्यात साथीच्या रोगाणे धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा आसर कमी होत असताना डेंग्यू व चिकन गुनिया सदृश्य आजारांचा उद्रेक होत आहे.शहर व तालुक्यात डेंग्यूचें आकरा व चिकन गुणियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागा कडून गावपातळीवर विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.रुग्ण व रुग्णाचा संपर्कातील नागरिकांची रक्तचाचणी करण्यासाठी 114 रक्त नमुने तपासणी साठी पाठवीन्यात आले आहेत. उमरगा शहरात पाच रुग्ण डेंग्यू चें आढळून आले आहेत. ग्रामीण भागात पळसगाव तांडा दोन, येणेगूर एक, मांडज एक, मुळज एक, मळगी एक, रुग्ण डेंग्यूचें आहेत तर तलमोड येथे एक रुग्ण चिकन गुनियाचा आढळून आला आहे. जिल्हास्तरावरील आरोग्य अधिकाऱ्यांनी शहर व प्रभावित गावात भेट देऊन पाहणी केली.

तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात डेंग्यू व चिकन गुणिया सदृश्य आजाराचे ३८ रुग्ण आढळून आले होते.यामुळे आरोग्य प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. शहरात ११ तर ग्रामीण भागात २७ रुग्ण आढळुन आले होते. यामध्ये सर्वाधिक येळी येथे नऊ, गुंजोटी तीन, एकोंडी, दाळींब, नारंगवाडी, कदेर  येथे प्रत्येकी दोन तर कडदोरा,तुरोरी, तुंगाव,सुपतगाव, कोळसुर, नाईचाकूर, बलसुर येथे प्रत्येकी एक रुग्ण डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आले होते. या नंत्तर आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रभावित गावात उपाययोजना करण्यात येत आहेत.यामध्ये आबेट औषधांची फवारणी करण्यात आली असून संबंधित गावात प्रत्येक घरात पाणीसाठ्याची कीटक शास्त्रीय सर्व्हेक्षण करून पाण्यात डासांच्या आळ्या आहेत का ? याचा शोध घेऊन त्याचे निर्मूलन करण्यात येत आहे. रुग्णाच्या परिवारातील आणि गावातील नागरिकांची आरोग्य सेविका व कर्मचारी यांच्या वतीने तापाची तपासणी करण्यात येत आहे. तसेच कोरडा दिवस पाळणे, डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना राबवून गावात साफसफाई, औषध फवारणी करण्यात येत असून बाधित गावातील रक्त नमुने घेण्यात येत आहेत.

 
Top