परंडा / प्रतिनिधी-

छत्रपतींच्या नावाशी तुलना करुन महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने पोलिस निरीक्षकांना शुक्रवारी (दि.२७) निवेदनातून करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी राजे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या या विभूतींच्या कर्तृत्वाची सोडा त्यांच्या नावाशीही तुलना करणे शक्य नाही. त्यामुळे या विभूतींच्या नावासोबत आजच्या नीतिमूल्यांचा लिलाव मांडणाऱ्या राजकारण्यांचे नाव जोडण्याचा उद्योग काही अंध समर्थकांनी केला आहे. त्यांच्या या कृतीने महाराष्ट्राच्या मातीच्या अस्मितेचा अवमान तर झाला आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई करा. निवेदनावर छावा क्रांतिवीर सेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख अमर शेख, जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे, तालुकाध्यक्ष विठ्ठल लटके, हरिभाऊ आदमिले, ज्योतिराम घोगरे, सीताराम सातपुते, मच्छिंद्र कदम आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top