तुळजापुर/ प्रतिनिधी-

तुळजापूर येथील निशांत हनुमंत भुजबळ यांनी बेंगलोर येथील राजीव गांधी हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी यांच्याकडून बी.ए.एम.एस. वैद्यकीय सेवेतील महत्त्वाची पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण महर्षी सि.ना. आलुरे गुरुजी यांचे ते नातू आहेत.

विरपुलिकेश आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बदामी ( कर्नाटक ) या महाविद्यालयांमधून निशांत हनुमंत भुजबळ यांनी ही पदवी संपादन केली आहे. राजीव गांधी हेल्थ युनिव्हर्सिटी बेंगलोर यांच्याकडून ही पदवी मिळाल्यानंतर माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर, तुळजापूरच्या नगराध्यक्ष सचिन रोचकरी, अणदूर सरपंच रामचंद्र आलुरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती एडवोकेट दीपक आलुरे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शित्रे, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, जेव्हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top