परंडा / प्रतिनिधी : -

परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील युवक शेतकरी मेघराज कल्याण भिलारे यांनी व त्यांच्या कुटुंबातील वडील कल्याण आश्रु भिलारे व आई संगिता कल्याण भिलारे यांच्या सहकार्याने ठिबक सिंचन व्दारे टॉमेटो व मिरचीचे पिके सध्या शेतामध्ये घेतले आहे.मेघराज यांचे शिक्षण बी ए इतके झाले असुन त्यांनी शासकीय नोकरीच्या पाठीमागे न लागता आधुनिक  पद्धतीने शेती करण्याचे ठरविले व त्यांनी शेतीमध्ये सुक्ष्म नियोजन व पाण्याचे चोख व्यवस्थापन केल्यास यश हमखास पदरात पडते हे दाखवुन दिले.

 


शेतकरी मेघराज बोलताना पुढे म्हणाले की, पुर्वी ते ऊस, कापुस, सोयाबीन, उडीद, सुर्यफुल, मका अशी पिके घेत होते परंतु हि पिके त्यांना काही परवडत नव्हती परंतु माझा मित्र अमोल बजिरंग गायवळ यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा सल्ला दिला त्यानंतर कलिंगड, खरबुज अशी पिके घेऊ लागल्यानंतर मला खर्च वजा जाता भरपुर नफा राहु लागला तसेच बहिर अँग्रो,जामखेड यांनी जास्त प्रमाणात जैविक खते व कमी प्रमाणामध्ये रासायानिक खताचा वापर करण्याचा सल्ला दिला तसेच सध्या तीन एकर क्षेत्रामध्ये टॉमेटो व  दोन एकर क्षेत्रामध्ये ढोबळी मिरचीचे पिके घेतली असून  पाच लाख खर्च वजा जाता निव्वळ सात लाख नफा मिळाला आहे.


“ शासकीय नोकरीच्या पाठीमागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती केल्यास भरपुर फायदा होतो. सध्या टोमॅटो व मिरची पिकाचे उत्पादन घेतले आहे त्यामध्ये माझ्या कुंटुबांचे व कृषि सहाय्यक कैलास देवकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.सध्या माझ्या शेतीमध्ये १५ महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे तरी सुशिक्षित मुलांनी शासकीय नोकरीच्या पाठीमागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करावी यश हमखास मिळते.”

                      मेघराज भिलारे -  शेतकरी, पांढरेवाडी.ता. परंडा


 
Top