परंडा / प्रतिनिधी :-

 लोकनेते नामदार बच्चूभाऊ कडू प्रहार संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री, शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य यांचे विचाराने कार्याने प्रभावित, प्रेरित होऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हिताचे प्रश्न व सामाजिक उपक्रम राबवून संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना कार्यरत आहे.

संघटनेचे राज्याध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चूभाऊ यांचे स्विय सहाय्यक संतोष राजगुरू यांचे सुचनेनुसार जिल्हा परिषद उस्मानाबाद माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमिक शिक्षक जिल्हाध्यक्ष पदी ऋषीनाथ खुणे यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य समन्वयक तथा प्रवक्ता दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा प्रवक्ता धनंजय आंधळे यांचे उपस्थितीत ऋषीनाथ खुणे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

सामाजिक कार्याची जाण आणि शैक्षणिक कार्यात झोकून देऊन काम करणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख आहे, त्यांची प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेत काम करण्याची तळमळ पाहता त्यांना ही नियुक्ती देण्यात आली व त्यांचा या प्रसंगी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

     यावेळी राज्य प्रवक्ते दत्तात्रय पुरी, जिल्हा प्रवक्ते धनंजय आंधळे, कचरे सर, दादासाहेब साबळे सर,वाळके सर, डॉ.खुणे आदि.उपस्थित होते.

माध्यमिक शिक्षक ऋषीनाथ खुणे यांचे निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत, जिल्हा सचिव दत्तात्रय राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल अंधारे जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत माने, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश गोरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रविंद्र राऊत,कळंब तालुका संपर्क प्रमुख गोविंद तापडे, जिल्हा सल्लागार भास्कर कांबळे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुषमा सांगळे-वनवे मॅडम आदि पदाधिकारी व समस्त माध्यमिक शिक्षक यांनी त्यांचे मनोमन स्वागत करून कौतुक केले.


 
Top