तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील श्रीतुळजाभवानीचे पुजारी प्रविण कदम यांचे चिरंजीव श्रवणराजे कदम यांचा वाढदिवस एचआयव्हीमुळे अनाथ  झालेल्या अनाथ आश्रमातील सर्व अनाथ मुलांना भोजन शैक्षणिक व नित्य कामांनसाठी लागणाऱ्या वस्तु भेट देवुन त्यांच्या समावेत बुधवार दि.१८ रोजी औरंगाबाद येथे साजरा केला.

तसेच यावेळी पारनेरचे आ. निलेश लंके यांच्या शरद पवार आरोग्य मंदीर कोविड सेंटरला अकरा हजारची मदत  आ. निलेश लंके यांचे बंधु दिपक लंके यांच्याकडे  सपूर्द करण्यात आली. प्रथमता श्रवणराजे यांचे श्रावणी व नंदिनी केरबा सुरवसे या भिगींनीनी प्रथम औक्षण केले.

 या कार्यक्रमास दिपक लंके स्वाभिमानी युवती शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्षा पूजाताई मोरे, सिंदफळ सरपंच अँड.अर्जून कापसे, सोनकर गुरुजी, औरंगाबाद येथील गुलमंडी शिवसेना प्रमुख सोमनाथ बोंबले, सौ. बोंबले,स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, उपाध्यक्ष धनाजी पेंदे ,अमोल कुतवळ, आवेज सिध्दीकी, नागनाथ इंगळे, चैतन्य गडदे, दादा रोकडे, एसटी महामंडळाचे वरिष्ठ लिपिक केरबा सुरवसे  आदींची उपस्थिती होती. 

कोरोना पार्श्वभूमीवर अनाथ आश्रमातील मुलांच्या होणाऱ्या गैररसोयी लक्षात घेवुन जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाअध्यक्ष श्रीकांत कदम यांचे पुतणे व  देविचे पुजारी प्रविण नरहरी कदम (केशव)यांचे चिरंजीव श्रवणराजे कदम यांचा वाढदिवस औरंगाबाद येथील एचआयव्हीग्रस्त अनाथ ७०  बालकांना  प्रथम भोजन देवुन नंतर त्यांना शिक्षणासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य तसेच नित्य नियमाने लागणारे शैक्षणिक वह्या, पुस्तके, शाल, सतरंजी, ताट, वाटी, थांब्या, ग्लास आदी वस्तू भेट देवुन  येथील भोज हाँटेल मध्ये भोजन देवून त्यांच्या समावेत श्रवणराजेचा वाढदिवस अनावश्यक खर्च टाळुन समाजपयोगी उपक्रम घेवुन साजरा करण्यात आला. 

 
Top