तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नाव समाविष्ट करणे,महात्मा फुले जिवनदायी योजना प्रमाणपत्र,  दुय्यम शिधापत्रका मागणी अर्ज असे (दि.१७)ऑगस्ट २०२१ व (दि.१८)ऑगस्ट २०२१रोजी या दोन दिवसीय शिबिरात एकूण २२४ अर्ज  शिधापत्रकाधारकांनी उपस्थित राहून अर्ज दाखल केले.

 पुरवठा विभागाच्या शिधापत्रका शिबिरात (दि.१७ व दि.१८ रोजीच्या शिबिरात नाव कमी करण्यासाठी 23 अर्ज दाखल झाले नाव वाढविणे यासाठी ७९अर्ज दाखल झाले,  दुय्यम शिधापत्रका मागणी अर्ज ९२ दाखल झाले , महात्मा फुले जिवनदायी योजना प्रमाणपत्रासाठी ३०अर्ज दाखल झाले असे एकूण २२४अर्ज दाखल करण्यात आलेल्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्यात आली आहे. यामुळे नागरीकांतून समाधान व्यक्त केला जात आहे. 

 याकामी तुळजापूर तहसिलचे तहसीलदार सौदागर तांदळे, पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी संदिप जाधव, तुळजापूर मंडळ अधिकारी, ए.बी कुलकर्णी, पुरवठा अवल कारकुन पवार, कलार्क कानाडे,सुरेश वाघमारे, बाळासाहेब सोनवणे, अंकुश जाधव, औदुंबर गिरी आदींसह  मंडळातील रास्त भाव दुकानदार आदींनी अथम परिश्रम घेतले.

 
Top