तेर / प्रतिनिधी-

पणजीच्या राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या राधा गोरे हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवावे, यासाठी तिला पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

युथ स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहाव्या राष्ट्रीय स्पर्धेत राधा हिने १८ वर्षांखालील वयोगटात ३८.५० मीटर भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. आमदार पाटील यांनी तिच्या घरी येऊन तिचा गौरव केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवाजीराव नाईकवाडी, सभापती अॅड. दत्ता देवळकर, पद्माकर फंड, सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रविराज चौगुले, विठ्ठल लामतुरे, बबलू मोमीन उपस्थित होते.

 
Top