कळंब / प्रतिनिधी-

नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांना निनावी धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. 23 ऑगस्टरोजी दुपारी 4 वाजता संजय मुंदडा यांच्या निवासस्थानी धमकीचे पत्र आल्याचे त्यांनी सांगितले. मुंदडा यांनी कळंब पोलिसात याबाबत आज तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटलंय की, मी संजय पांडुरंग मुंदडा सध्या परिस्थितीत उपनगराध्यक्ष आहे. कळंब नगरपरिषदेचे सध्या गावात विविध विकास कामे सुरू आहे.

यापैकीच एक काम हे सावरकर चौक ते सोनार लाईन सिमेंट रस्ता व दोन्ही बाजूंचे नालीचे काम सुरू आहे. सदर रस्त्यावर उत्तरबाजुला मौलाना अबुल कलाम आझाद शॉपिंग सेंटरच्या नावाने नगर परिषदेच्या मालकीचे गाळे आहेत.

या गाळ्यांपैकी काही गाळेधारक भाडेकरूंनी दिलेल्या जागेपेक्षा आधीकच्या जागेत स्वतःच्या इच्छेने व कोणाचीही परवानगी न घेता कट्टे बांधून सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे.

सदर ठिकाणी नाली बांधकाम करताना ते कट्टे तोडून काढणे प्रशासनाला आवश्यक वाटल्यामुळे त्यांनी संबंधितांना तोंडी सूचना दिल्या. यानंतर या गाळेधारकांपैकी एक श्री माने यांनी दिनांक 22 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी सव्वा एक वाजता माझ्या मोबाईल क्रमांकावर फोन करून सदर कट्टे तोडू नये, असे सांगितले.

तसेच माने यांनी माझ्या संपर्कातील काही सहकारी मित्र व नगर परिषदेचे अधिकारी यांना फोन करून संजय मुंदडा यांना मॅनेज करा, परंतु कट्टे पाडू नका, असे सांगितल्याचे मुंदडा यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर दिनांक 23 ऑगस्ट 2021 च्या दुपारी चार वाजता माझ्या घरच्या पत्त्यावर एक निनावी पत्र आले, त्यात सदर कट्टे तोडल्यास मुस्लिम लोक माझ्यावर हल्ला करतील व माझ्या जीविताला धोका आहे असे सुचवून अप्रत्यक्षरीत्या मला धमकी देण्यात आली आहे.

अतिक्रमण तोडण्यापासून नगरपरिषद प्रशासनास परावृत्त करणे.

2) विकास कामात खोडा घालून मला धमकावणे.

3)मुस्लिम समाजाकडे अंगुलीनिर्देश करून दोन समाजात तेढ निर्माण करणे, या तिन्ही उद्देशाचे अवलोकन करून त्या अनुषंगाने पत्र लिहिणाऱ्याचा तपास करून योग्य त्या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात यावा, असे संजय मुंदडा यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत पुडील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे

 
Top