उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

आज गोर सेनेच्या साखळी उपोषणास ओबीसी संघर्ष समिती  व  गुरव समाज  व नाभिक समाज संघटनेने  पाठिंबा दिला. 

गोर- सेना यांच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यसरकारने तात्काळ कार्यवाही करणे,ओबीसीचे जातनिहाय जनगणना करणे बाबत आदी मागण्यांसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणला पाठिंबा देण्यासाठी तेली समाज संघटनेचे राज्य युवक उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,शिवसेना नगर परिषदेचे गटनेते सोमनाथ आप्पा गुरव,ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पाठिंबा देऊन सर्वोतपरी साखळी उपोषणास पाठिंबा तर आहेच वेळ पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते बोलावुन अजुन पाठिंबा वाढविण्या संदर्भात भाष्य केले. तसेच यापुढेही तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचे आश्वासन दिले.


 
Top