उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 घरातील वीजपुरवठा तोडल्याने वीज कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी (दि. १७) दुपारी ४.३० वाजता घडली. महावितरण कर्मचारी संजय नानु पवार तेरणा महाविद्यालय चौकातून कार्यालयीन कामानिमीत्त जात असताना उस्मानाबाद येथील सोमनाथ बालाजी पांढरे यांनी “माझ्या घराचे विज जोडणी का तोडली पुन्हा आमच्या परिसरात फिरायचे नाही.” असे संजय पवार यांना धमकावून शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यांनी संजय पवार यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन संजय पवार यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


 
Top