तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर मनसेच्या विभागीय मेळाव्यात आगामी निवडणुका ताकदीने  लढण्याचा निर्णय मनसेच्या  माजारसुंभा जिल्हा  बीड येथे घेण्यात आलेल्या  मराठवाडा विभागीय मेळाव्यात घेण्यात  आला. कोरोनाच्या या भयंकर संकटामुळे गेली 1 वर्ष  कोणाचीही भेट व बोलणे झाले नव्हते.

परंतु सर्व जिल्हा अध्यक्ष यांनी महाराष्ट्र सैनिक व सर्व पदाधिकारी यांच्यासह आपापल्या भागात आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेला मदत करत होते. या कोरोनामुळे अनेकांनी आपले नातेवाईक गमावले.त्यामुळे सर्वांशी चर्चा करण्यासाठी तसेच सहकार सेना, शेतकरी सेना याबाबत चर्चा करण्यासाठी, तसेच आगामी येणारी,महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती,निवडणूक ताकदीने लढविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

यावेळी मनसेचे  प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे, शेतकरी सेना प्रदेश अध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे, प्रदेश उपाध्यक्ष सुमित खांबेकर,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, राजेंद्र गपाट, आबा ढवळे,  संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, जालना जिल्हा अध्यक्ष बळीराम खटके, गजानन गीते, प्रकाश बापू सोळंखे, परभणी जिल्हा अध्यक्ष शेख राज,  गणेश सुरवसे, बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मोटे, सुमंत धस, वैभव काकडे, श्रीराम बादाडे,लातूर जिल्हा अध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने आदी उपस्थित होते.

 
Top