उमरगा / प्रतिनिधी-
शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. याचा योग्य व नियोजनपूर्वक वापर करून सर्व गुणसंपन्न विद्यार्थी तयार करणे गरजेचे आहे. सर्वच शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी ही संकल्पना राबविली पाहिजे. त्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
उमरगा तालुक्यातील आठ जिल्हा परिषद हायस्कूलमधील गुणवत्ता वाढीसाठी पापा अभियान सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाच्या तयारीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेतली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, गट विकास अधिकारी शिवकुमार बिराजदार, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, मुख्याध्यापक मधुकर मंमाळे, श्रीमती मीना सोनकांबळे, महेश कांबळे,बालाजी गाडेकर, लक्ष्मण चव्हाण, वसंत जाधव, एच. एम .तोटलवार उपस्थित होते. यावेळी शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रशालेततुन प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कु. मुंगले अल्फिया अजीज 94.60 कु. उस्ताद सानिया राजाबाई 94.60 या दोन विद्यार्थिनी प्रशालेतून संयुक्तरित्या प्रथम आलेले आहे. क. रमेजा जाफर उस्ताद 94% द्वितीय तर सम्रीन अफसर शेख 92.60 या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळविला आहे .उर्वरित 26 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता उपासे तर आभार मधुकर मंमाळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी बशीर शेख, सोनाली मुसळे, बलभीम चव्हाण, ममता गायकवाड, सदानंद कुंभार, शिल्पा चंदनशिवे आदी उपस्थित होते.