तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजाभवानी मंदिरासमोरून शुक्रवार पेठेकडे जाणाऱ्या मार्गावरील दगडी पायऱ्या काढून रस्ता करण्याची मागणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे नगरसेवक सुनिल रोचकरी यांनी केली आहे.

तुळजापूर विकास प्राधिकरणातून मंदिरासमोर दगडी पायऱ्या करण्यात आल्या आहेत. मात्र या पायऱ्या अडचणीचा झाल्या असून त्यावरुन कोणीही येत किंवा जात नाही. उलट दगडी पायऱ्यांवर दुचाकी लावण्यात येत असल्याने अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शुक्रवार पेठेकडे जाणारे भाविक, पुजारी व नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. या पायऱ्या काढून तेथे पूर्वीप्रमाणे रस्ता करावा. निवेदनावर अंबादास कदम, रमेश अमृतराव, शेषकुमार रोचकरी, आकाश अमृतराव, शिवाजी अमृतराव, प्रशांत क्षीरसागर, महेश अमृतराव, उमेश क्षीरसागर, विक्रम शिंदे, योगेश रोचकरी आदी नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top