तुळजापूर / प्रतिनिधी-

तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स मधील कर्मचाऱ्यांचा मुलगा अजय बालक पानपुडे यांची नेव्ही ऑफिसर म्हणून  निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी  वेळेस प्रणव भोसले, विक्रम नाईकवाडी, संग्राम नायकवाडी, गव्हाणे, महेश, नडमाने, शुभम शेंडगे, दिलीप नाईकवाडी,ओंकार ढवळे, प्रसाद पानपुडे ,हर्षद लबडे इत्यादी उपस्थित होते

अजय बालक पानपुडे हे तुळजापूर येथील तुळजापूर खुर्द भागातील असुन त्यांचे वडील व भाऊ हे तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स मध्ये सेवेत आहेत अजय चे शिक्षण प्राथमिक तामलवाडी  येथे तर माध्यमिक शिक्षण  पुणे येथे झाले असुन नेव्हीचे शिक्षण लोणवळा येथे झाले आहे त्यांच्या या निवडी बद्दल सर्वञ अभिनंदन होत आहे.


 
Top