उस्मानाबाद / प्रतिनिधी-

किरकोळ आणि घाऊक स्वरुपात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना लघुउद्योगात समावेश करण्याचा निर्णय केंद्रीय वाहतूक आणि लघुउद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी शुक्रवारी जाहीर केला, या निर्णयाचा फायदा देशातील अडीच कोटी व्यापाऱ्यांना होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे, या निर्णयाचे स्वागत करत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले.

 लघु उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे किरकोळ आणि ठोक विक्रेते चार वर्षांपर्यंत एमएसएमई श्रेणीत होते काही वर्षा पूर्वी मध्ये हा दर्जा काढला होता त्यानंतर एमएसएमई पुन्हा हा दर्जा बहाल  करण्याची मागणी व्यापारी करत होते, त्यांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे, रिटेलर आणि घाऊक व्यापाऱ्यांना अशा सर्व योजना आणि सुविधांचा फायदा मिळेल ते प्रायोरिटी सेक्टर लँडिंग मध्ये येतील, तसेच त्यांना कमी दरावर कर्ज मिळू शकेल या शिवाय वित्त मंत्रालय आणि एमएसएमइ मंत्रालयाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ मिळेल, तसेच ते इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीमचा फायदा घेऊ शकतील. एमएसएमइ साठीच्या योजनांचा फायदा उचलण्यासाठी रिटेल आणि ठोक विक्रेत्यांना आपला  व्यावसायिक आराखडा चांगला करावा लागेल, त्यांना व्यावसायिक संचालन आणि रिपोर्टिंग पद्धतीला फॉर्मल सिस्टीम मध्ये आणावे लागेल, खूप सारे रिटेलर आत्तापर्यंत बिझनेसला फॉर्मल करणे टाळत होते, तेही त्यास फार्मल करण्यास इच्छुक होतील, या सर्व सुविधांसाठी सर्वात आधी रिटेलर आणि ठोक विक्रेत्यांना एमएसएमईत नोंदणी करावी लागेल आणि ही नोंदणी www.myudyogaadhar.org वर जाऊन करावी लागेल. सर्व सामान्य व्यापांऱ्यांच्या आग्रही मागणीला होकार देवून त्यांना न्याय दिला त्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे. आणि या निर्णयामुळे असंख्य व्यापाऱ्यांना फायदा होईल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

 
Top