लोहारा/प्रतिनिधी

हजरत सय्यद मुहंमद जौनपरी माऊद उर्स निमित्त अलगाजी महेदवीया सोशल ट्रस्ट लोहारा व सहयाद्री ब्लड बँक उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा  शहरातील मजीद ए मिरांजी येथे दि.3 जुलै 2021 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकुण 54 जणांनी रक्तदान केले. 

सह्याद्री ब्लड बँक उस्मानाबाद यांनी रक्ताचे संकलन केले. यावेळी प्रमुख म्हणून जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, माजी नगरसेवक अभिमान खराडे, जगदिश लांडगे, माजी पं.स.सदस्य दिपक रोडगे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, शाम नारायणकर, श्रीशैल्य स्वामी, सचिन ठेले, मतीन शेख, नावेद खानापुरे, अदि, उपस्थित होते. यावेळी रक्तदात्यांना एक कुकर भेट स्वरूपात देण्यात आले. या शिबिरासाठी अलगाजी महेदवीया सोशल ट्रस्ट अध्यक्ष बाबुलाल मोमीन, उपाध्यक्ष युनुस मोमीन, सचिव महंमद हिप्परगे, गफुर मोमीन, हाजी जहांगीर हिप्परगे, खादर मोमीन, नुर मोमीन, गौस मोमीन, सय्यद चाऊस, खुनमिर मोमीन, इस्माईल मोमीन, मुबारक हिप्परगे, आदींनी परिश्रम घेतले.

 
Top