उस्मानाबाद / प्रतिनिधी

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीने शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. मनोहर धोंडे सर यांच्या आदेशाने मराठवाड्याचे उपाध्यक्ष सुनील आप्पा शेरखाने याच्या प्रमुख उपस्थिती  जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देण्यात आले

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ओ. बी. सी.समाजाचे २७% राजकीय आरक्षण त्वरित पूर्ववत चालू करण्यात यावे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील ओबीसीचे २७ % राजकीय आरक्षण पूर्ववत चालू होई पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका पुढे ढकलण्यात याव्यात. राज्य सरकार मधील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पदोउन्नती साठी ओबीसीसह एससी व एसटी यांचे हक्काचे एकूण ५२ % आरक्षण लागू करून कर्मचाऱ्यांची पदोउन्नती करण्यात यावी. सन २०२१ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसीची जात निहाय जनगणना करण्यात यावी यासह इतर मागण्याचे निवेदन देण्यात आले. पुढील काळात उग्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

 यावेळी प्रमोद भुजबळ शिवा संघटना मराठवाडा संघटक, संजय गिराम जिल्हाध्यक्ष, आनंद मनगिरे, भाऊसाहेब बेलुरे,विनोद वाडकर, अभिषेक कोरे समाधान भोरे, महेश उपासे यांच्या सह शिवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

 
Top