उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शिवसेनेकडून संपूर्ण राज्यभरात संपर्क अभियान  सुरू आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न आणि विशेषत: शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यावर भर दिला जात आहे. मात्र, या शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या संदर्भातील बॅनरवरुन उस्मानाबाद  जिल्हयातील परंडा येथे   शिवसैनिकांत जोरदार हणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बॅनरवर फोटो न लावल्याच्या रागातून शिवसैनिक आपआपसात भिडण्याची घटना मंगळवार दि. २० जुलै रोजी घडली. यामध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी झाले आहेत.

 उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथे  शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव  यांच्यावर जीवघेणा हल्ला  केला असल्याची माहिती समोर येत आहे.सध्या तालुका स्थरावर शिवसेना संपर्क अभियान सुरू असून या अभियानमध्ये माजी आमदार  यांचा फोटो बॅनरवर न लावल्याने हा वाद झाल्याचे समजतेय. 

या प्रकारामुळे शिवसेनेतील जुना व नवा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.    हा वाद येथेच सुरू राहतो का वाढतो या बाबत चर्चा सुरू असून मारहाण झालेल्या अण्णा जाधव यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर  बार्शीमधील जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरू , असल्याचे सांगण्यात आले.या संदर्भात परंडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची कर्यवाही चालू असल्याची माहिती मिळाली. 

 
Top