उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रिलायन्स फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून एक लाखाचे कर्ज देण्यासाठी ३० हजार २९९ रुपये खात्यात भरून घेत फसवणूक करणाऱ्या भामट्याला उस्मानाबादच्या सायबर क्राईम सेलने बिहारमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या.

शरद नामदेव सिरसाठ (रा. सकनेवाडी, ता. उस्मानाबाद) यांना २९ डिसेंबरला एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन कॉल आला. त्या कॉलवरील व्यक्तीने ‘मी रिलायन्स फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक बोलत असुन तुम्हाला एक लाख रुपयांचे कर्ज मंजुर झाले आहे, असे सिरसाठ यांना सांगितले. कर्ज प्रक्रियेसाठी त्यांच्याकडुन एकुण ३० हजार २९९ रुपये स्वत:च्या बँक खात्यात भरण्यास सांगितले. सिरसाठ यांनीही शहानिशा न करता रक्कम भरली. याप्रकरणी त्यावेळी गुन्हाही दाखल झाला. तपासात सायबर क्राईम सेलच्या पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, हवालदार कुलकणी, पोलिस नाईक संजय हालसे, राहुल नाईकवाडी, गणेश जाधव, हवालदार आकाश तिळगुळे, मकसुद काझी, अनिल भोसले, सुनिल मोरे, गणेश हजारे, विमल पौळ, नलावडे, अपेक्षा खांडेकर यांच्या पथकाने आरोपीच्या मोबाइल क्रमांकाच्या तसेच बँक खात्याचे तांत्रिक विश्लेषण केले असता हा गुन्हा राहुल कुमार लखन प्रसाद लहेरी (२१, रा. भागलपूर, बिहार) याने केल्याचे निष्पन्न झाले. माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक अनिल टोंगळे, हलवादार किशोर रोकडे, गणेश खैरे, बळीराम घुगे यांच्या पथकाने भागलपुर, येथे सात दिवस तपास करुन आरोपी राहुल कुमार यास अटक केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक अर्चना पाटील या करत आहेत.


 
Top