तुळजापूर/ प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात आषाढी एकादशी सोहळा पारंपारिक पध्दतीने मंगळवार दि.२० रोजी साजरा करण्यात आला. आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरासह परिसरातील श्री विठ्ठल-रखुमाई मंदीरात भाविक भक्तांनी दर्शनार्थ गर्दी केली होती.

श्री तुळजाभवानी मंदीरातील श्रीविठ्ठल-रखुमाई मंदीरात मंगळवार सकाळी मुर्तींना अभिषेक करण्यात येवुन नंतर वस्ञोलंकार घालण्यात आले.  शहरातील  कासारगल्लीत असणाऱ्या श्रीविठ्ठल-रखुमाई मंदीरात भाविकांनी पुजाअर्चा करुन मनोभावे दर्शन घेतले. यंदा किर्तन भजन आदी कुठलेही धार्मिक कार्यक्रम कोरोनामुळे झाले नाहीत.

 
Top