तेर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील विविध विद्यालयात इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यीनीचा सत्कार करण्यात आला .

 तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील विद्यार्थीनी अरेबीया अन्सार मुलांनी हिने 98.80 टक्के गुण मिळवत विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला तर तेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  विद्यार्थीनी  सानिका राजाराम मेंगले हिने 98.40 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तसेच जिल्हा परिषद उर्दु प्रशालेची  विद्यार्थीनी सना कलिमोदिन काझी हिने 91.20 टक्के गुण मिळवत प्रशालेतून प्रथम क्रमांक पटकाविला.

 या यशाबद्दल नरहरी बडवे , गोरख माळी हरी खोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राजाराम मेंगले , अन्सार मुलांनी , नासेर काझी , गोविंद नाईकवाडी आदि उपस्थित होते.

 
Top