उस्मानाबाद/ प्रतिनिधी

मांडवा ग्रामपंचायतीच्या सरपंच डॉ. सौ. योगिनी संजय देशमुख यांची सरपंच परिषदेच्या जिल्हा महिलाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व सरचिटणीस अॅड. विकास जाधव यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली.

सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नूतन सरपंचांना ग्रामविकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी सूचक मार्गदर्शन, प्रशासकीय कामात येणारे अडथळे, ग्रामपंचायत अधिनियम बाबत सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.


 
Top