उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हा वीटभट्टी मालक युनियनची स्थापना करण्यात आली आहे. या युनियनच्या कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठक घेण्यात घेऊन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. या युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत साळुंके यांची तर जिल्हा कार्याध्यक्षपदी बापूसाहेब कणे यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी अशी- जिल्हा उपाध्यक्षपदी शेख शौकत नूरुद्दीन तर सचिव म्हणून शंकर साळुंके, सहसचिवपदी प्रमोद गायकवाड व कोषाध्यक्षपदी शौकत शेख, जिल्हा संघटकपदी बाबा रोटे, उस्मानाबाद शहराध्यक्षपदी गुणवंत काकडे तर जिल्हा सदस्यपदी सलमान मुल्ला, रिझवान मुजावर, खाजामियॉं मुलांनी, दत्ता चव्हाण, प्रमोद मोरे, अलीम शेख, सलाउद्दीन शेख व अब्दुल करीम कुरेशी, जमील, अखिल, हुसेन खाजा, सास्तुरे, वाकुरे व जाफर मुजावर यांचा समावेश करण्यात आला आहे.

 
Top