लोहारा/प्रतिनिधी

मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची लस देण्यात पक्षपातपणा करून सर्वसामान्य नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकत्सक यांना दि.6 जुलै रोजी देण्यात आले आहे.

 या निवेदन म्हटले आहे की,  मुरुम येथील ग्रामीण रुग्णालयात covid-19 ची प्रतिबंधित प्लस घेण्याकरिता शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत‌. नागरिकांना लस घेण्यासाठी तारांबळ होऊ नये यासाठी आरोग्य प्रशासनाने गर्दी झाल्यास रांग लावून लस देण्याचे नियम केले आहे. परंतु मुरूम येथे रुग्णालयात संबधित कर्मचाऱ्याने सर्वसामान्यसाठीच हे नियम लागू केले आहे. नागरिकांच्या  गर्दीच्या परिस्थितीतही ग्रामीण रुग्णालयातील संबंधित  कर्मचारी आपल्या ओळखीच्या माध्यमाचा वापर करुण सर्वसामान्य लोकांना बाजूला सारत धनदांडग्यांना प्रथमता लस देण्याचे काम करीत आहेत‌. यात गांभीर्य की विशिष्ट राजीकय लोकांच्या कार्यर्त्यांनी या कर्मचाऱ्यांला फोन केले की कसलीही नोंद न घेता त्यांनी शिफारस केलेल्या  व्यक्तीना अनधिकृत लस दिले जाते. व काहीं वेळेस तर स्वतः कार्यकर्ते थेट दालनात येऊन नियमबाह्यरित्या लस द्यायाला लावतात. यामुळे नियमानुसार ऑनलाइन नोंद केलेल्याना तासन् तास रांगेत  थांबलेल्या लोकांना याचा नाहक त्रास होत आहे. अशा जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या  कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फसण्यात येईल, अशा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, शहराध्यक्ष बाबा कुरेशी यांच्या सह्या आहेत. 

 
Top