उस्मानाबाद / प्रतिनिधी-    

जिल्ह्यातील १२ लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. तर ४६ लसीकरण केंद्रावर ४५ वर्षा पुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रंटवर्कर यांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.

लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदाता कार्ड यापैकी ओळखपत्र सोबत बाळगावे. या केंद्रावर केवळ १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तर  १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्याने लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये.  

लसीकरण केंद्र ठिकाण पुढीलप्रमाणे - ग्रामीण रुग्णालय मुरूम, लोहारा, सास्तूर, तेर, वाशी, भूम, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उमरगा, कळंब, भूम, परंडा, शासकीय आयुर्वेदिक  महाविद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी ऑनलाईन प्रत्येकी २०० व ऑनस्पॉट १०० तर  जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद या ठिकाणी ऑनलाइन ३०० व ऑनस्पॉट १०० डोस उपलब्ध असणार आहेत. तर कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ४४ लसीकरण केंद्रावर दिला जाणार आहे. ती केंद्रे पुढीलप्रमाणे सर्व  प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भाग तालुकानिहाय 

उस्मानाबाद - येडशी, ढोकी, कोंड, जागजी, पाडोळी, पाटोदा, केशेगाव, पोहनेर, बेंबळी व समुद्रवाणी तर तुळजापूर - अणदूर, जळकोट, नळदुर्ग, सावरगाव, काटगाव, सलगरा दि, मंगरूळ तु. तर उमरगा - मुळज, नाईचाकूर, येणेगुर, आलूर, डिग्गी व लोहारा - कानेगाव, माकणी, जेवळी आष्टा कासार तसेच कळंब - शिराढोण, येरमाळा, मोहा, दहिफळ, ईटकुर, मंगरूळ क तर वाशी - पारा, पारगाव, तेरखेडा व भूम - ईट, पाथरूड, माणकेश्वर, वालवड, आंबी,  परंडा - आसू, आनाळा, जवळा नि, शेळगाव या ठिकाणी ऑन स्पोर्ट प्रत्येकी १५० डोस उपलब्ध असणार आहेत. 

तर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग रोड उस्मानाबाद, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर उस्मानाबाद याठिकाणी ऑनलाईन व ऑनस्पॉट प्रत्येकी ७५ डोस उपलब्ध असणार आहेत. 

 लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रा व्यतिरिक्त इतर सर्व लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आणि ऑन साईट ऑन स्पॉट नोंदणी या दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ऑनलाईन बुकींग करण्यासाठी स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. तर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकन वाटप करण्यात येणार असून लसीकरण केंद्र ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगर पालिका व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरण यामध्ये मदत करावी. तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

 
Top