तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या सातबाऱ्यांवरील पोटखराब जमीन उल्लेख रद्द करण्याची  मागणी भष्ट्राचार निर्मुलन समितीने जिल्हाधिकारी यांना तहसिलदार मार्फत निवेदन देवुन केली.

 निवेदनात म्हटले आहे की, तुळजापुर तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या नावावर जमीनी अत्यल्प राहिल्या असुन त्यात पोटखराब जमीन उल्लेख जास्त आहे. जुन्या काळात जमीनी जास्त जमीनी मालक कमी होते. परंतु आता प्रत्येक घरात वाटणी झाल्याने जमीनी अत्यल्प झाल्या असुन त्यामध्ये पोटखराब जमीन उल्लेख जास्त आहे अश्याने शेतकरी वर्गात वाटनी करण्यास अडचनी येत आहेत अश्याने जमीन वाटणी दरम्यान हाणामारीचे प्रकार वाढत आहेत सध्या शेतजमीनी मध्ये वाटण्या झाल्याने सर्व जमीनी पीक घेण्यायोग्य झाल्या आहेत व त्या शेतकऱ्याना कुटलाही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही

 तुळजापुर तालुक्यातील हजारो शेतकरी या पासून वंचीत राहत आहेत.सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रत्येक सज्जा तलाटी अधिकारी यांना प्रत्येक शेतजमीनीचे पंचनामे करण्याचे आदेश अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल याची प्रशासनाने घ्यावी दखल घ्यावी असे निवेदनात म्हटलं आहे.हे भ्रष्टाचार निर्मूलन समीतीचे जिल्हाध्यक्ष अँड धिरज जाधव,तालुका अध्यक्ष विजय भोसले तालुका सचिव दिनेश कापसे व सदस्य प्रमुख संकेत शिंदे यांनी दिले.

 
Top