तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूरात शुक्रवार दि23रोजी गुरुपोर्णिमा सोहळा कोरोना  पार्श्वभूमीवर पारंपारिक पध्दतीने धार्मिक विधी करुन  साजरी करण्यात आला.तसेच गुरुपोर्णिमा पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

 गुरुपोर्णिमा सोहळा पार्श्वभूमीवर  श्री तुळजाभवानी मंदीरात  देविजींना दुग्धअभिषेक झाल्यानंतर देविंजींना  वस्ञोलंकार घालण्यात आल्यानंतर आरती करण्यात आली.  राञी श्रीतुळजाभवानी मंदीर प्रांगणात देविजींचा छबिना काढण्यात आल्यानंतर मंहत वाकोजीबुवा, गुरु तुकोजीबुवा यांनी जोगवा मागितल्यानंतर गुरुपोर्णिमा उत्सवाचा  दिनाचा धार्मिक विधींचा सांगता झाली.

  गुरुपोर्णिमा दिनी  गुरुवर्यांचा आशिर्वाद  घेण्यासाठी  श्रीतुळजाभवानी देविचे मंहत  तुकोजीबुवा, मंहत हमरोजी बुवा, मंहत मावजीनाथ, मंहत इच्छागिरी, मंहत दत्तअरण्य महाराजांचे दर्शन  घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

 
Top