उमरगा / प्रतिनिधी :- 

शहरातील आंबेडकर वाचनालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील याच्या हस्ते   गुरुवारी दुपारी करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधान ग्रंथ देऊन बसवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी   नगराध्यक्ष अनिता अंबर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, दिलीप भालेराव, उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड, रशीद शेख, विजयालक्ष्मी भालेराव, श्रीकांत बेंडकाळे, आयुब मासुलदार, प्रमोद कुलकर्णी, योगेश राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झुंबर बनसोडे, महेंद्र गायकवाड, रूपचंद गायकवाड, महेंद्र कांबळे, बलभीम कांबळे, राहुल कांबळे, विजय कांबळे, प्रशांत गायकवाड, चंद्रकांत गोडबोले, भगवान कांबळे, राजेश गायकवाड, महेश लिमये, अजिंक्य कांबळे, किरण गायकवाड, आनंद कांबळे, सिद्धांत गायकवाड, प्रणित गायकवाड, प्रशांत मुरूमकर, समर्थ गोडबोले, आबाराव कांबळे, प्रा.महेश कांबळे, सिद्धांत सोनवणे, प्रणाली कांबळे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अण्णाराव कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे यांनी मानले.  

 
Top