परंडा / प्रतिनिधी :- 

परंडा शहरालगत असलेल्या संगम पार्क वसाहतीमध्ये कॉंक्रीट रस्ते तयार करा अशी मागणीचे निवेदन गुरुवार दि.२२ रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या मार्फत देण्यात आले आहे.

 शहरालगत असलेल्या संगम पार्क मध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून रस्ता नाही या वसाहतीमध्ये अनेक नोकरवर्ग, कामगार ,शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने राहतात.या संगम पार्क मधून बाजारपेठेत जाण्यासाठी शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी किंवा उद्योगधंद्यासाठी जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही संगम पार्क हे ग्रामीण मध्ये येत असल्यामुळे आणि नगरपरिषदेच्या हद्दीत नसल्यामुळे यावसाहतिला कोणीच वाली नाही.अद्याप कोणीही दखल घेतली नाही.तेव्हा या निवेदनाची प्रशासनाने दखल घेऊन येथील रहिवाशांच्या जिव्हाळ्याचा  प्रश्न मार्गी लावावा अशा विनंतीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले आहे. परांडा तहसीलचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी हे निवेदन स्वीकारले व पुढील कारवाईसाठी मार्गस्थ केले .

 दिलेल्या निवेदनावर संगम पार्क वसाहतीमध्ये रहिवासी असलेले डॉ.शहाजी चंदनशिवे,राहुल बनसोडे, बिभीशन शिंदे, सुधीर कुलकर्णी, मुबारक पठाण, बाबासाहेब शिरसागर ,शिवाजी वाघमारे, किशोर वाघमारे ,बबन ब्रह्मराक्षस ,सोहेल पठाण, प्रकाश लोकरे ,प्रा शंकर कुठे, हिमालय वाघमारे, शिरीष नवले, सुभाष शिंदे, मुन्ना दखनी, सुभाष भालेराव आदींच्या स्वाक्ष्ऱ्या आहेत. 

 
Top