शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने तसेच शिवसेनेचे उपनेते मा आमदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिवसंपर्क अभियानाला सुरवात करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने वाशी तालुक्यातील पारगाव येथे आज पारगाव सर्कल ची बैठक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गौतम लटके यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी उपस्थीत शिवसैनिकांना राज्य सरकार ने राबविलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचवा, त्याच प्रमाणे पक्षातील गट तट बाजूला सारून कामाला सुरुवात करा, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आदेश जिल्हा प्रमुख गौतम लटके यांनी शिवसैनिकांना दिले.यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख चेतन बोराडे,तालुका प्रमुख सत्यवान गपाट,तालुका संघटक शिवहार स्वामी,उप तालुका प्रमुख विकास तळेकर,युवासेनेचे तालुका प्रमुख बालाजी लाखे,उप तालुका प्रमुख स्वप्नील कोकाटे, माजी तालुका प्रमुख दीपक जोगदंड, रवींद्र धर्माधिकारी,बंडू खोसे, बंडू मुळे,कनिफ काणतोडे,तानाजी कोकाटे,राजा कोळी,दिनकर शिंदे, प्रवीण गायकवाड,तात्या गायकवाड, दशरथ नाळपे, प्रदीप कोकणे, बाबासाहेब हारे,राजाभाऊ जोगदंड, कानिफनाथ इंगोले,आदी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थीत होते.