उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

तालुक्यातील सारोळा बु ग्रामपंचायतीच्या अतंर्गत येणाऱ्या शिंदेवाडी गावात वृक्षारोपणाचा शुभारंभ आज दि. १९ जुलै रोजी करण्यात आला आहे.  या गावाच्या परिसरात ४००० झाडाचे वृक्षारोपण होणार आहे. 

सारोळा गावात सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळांच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले होते ग्रामपंचायतीने या झाडांचे संवर्धन चांगल्या प्रकारे केल्याने या आंबाच्या झाडांना गेलेल्या वर्षी आंबे लागले होते आता त्यातच ग्रामपंचायतीच्या वतीने शिंदेवाडी येथे  क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेरील बाजूने गोल करून ही झाडे लावण्यात येत आहेत. यावेळी वृक्षारोपण करताना गावाचे सरपंच प्रशांत रणदिवे ग्रा.पं.सदस्य सुधाकर देवगिरे, पंडित देवकर , ग्रामसेवक योगेश मुंडे, कर्मचारी शैलेश शिंदे, पांडूरंग रणदिवे, नवनाथ माळी,संतोष गायकवाड तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते


 
Top