आपले जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना बांधवांकडून होणाऱ्या कीटकनाशकांचा वापर तसेच त्याचे दुष्परिणाम व आवश्यक ते उपचार याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टरांनी सजग राहावे जेणेकरून कीटकनाशकापासून विषबाधा, दुर्घटना टाळू शकतील असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आयोजित डॉक्टरांच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये दिले.
कृषी आयुक्तालय, कृषी विभाग पुणे, क्रॉप लाइफ इंडिया व शिवार फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिलीच कीटकनाशकापासुन पासून दुष्परिणाम टाळण्यासाठी दक्षता उपचार व्यवस्थापन याबाबत जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्यशाळा ऑनलाइन झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प डॉ. विजयकुमार फड , जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. धनंजय पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच्. व्ही. वडगावे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे, कृषी विकास अधिकारी डॉ. टी. जे. चिमणशेट्ये, क्रॉप लाइफचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तित्व सेन, बायरचे सुशिल देसाई, शिवार फाऊंडेशनचे विनायक हेगाणा आदी उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रशिक्षक तथा केंद्र शासनाची माजी आरोग्य अतिरिक्त महासंचालक डॉ. देवव्रत कानुंगो यांनी जिल्ह्यातील शंभरपेक्षा जास्त प्राथमिक आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी यांना कीटकनाशक विष बाधा झाल्यानंतर जिल्ह्यातील दुर्घटना टाळण्यासाठी विविध उपाय योजना व कोविडच्या अनुषंगाने यातील फरक कसे ओळखावे,विषबाधा यांच्या प्रकरणात डॉक्टरांनी करावयाचे विविध उपचार पद्धती, औषधांची उपलब्धता याची शास्त्रयुक्त माहिती दिली. अनेकदा कृषी विभागाची शिफारस असो किंवा नसो शेतकरी बांधवांकडून अनेक उत्पादने एकत्र करून रसायने तयार केली जातात. अशावेळी, दुष्परिणाम घडल्यास कुठला अँटी-डोस द्यायचा या विषयी अद्यावत माहिती असावी.तसेच, कृषी व आरोग्य विभागाकडून जनजागृती साठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. असे कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे मुख्य गुणनियंत्रण अधिकारी, कृषी आयुक्तालय, पुणे श्री. सुनिल बोरकर यांनी संबोधित केले. याच बरोबर यवतमाळ व जळगाव जिल्हातुन ही 1100 पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सेन यांनी प्रस्तावना तर संयोजक शिवार फौंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी आभार मानले.