तेर / प्रतिनिधी

१ जुलै डॉक्टर डे व भारतीय स्टेट बँक स्थापना दिन याचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय तेर तेथे संयुक्तरित्या भारतीय स्टेट बँक शाखा  तेर यांच्या वतीने कार्यक्रम साजरा केला.

 भारतीय स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक  विलास शिंदे यांची  कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती  होती. विलास शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर डे निमित्त ग्रामीण रुग्णालय तेरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.एस. मगरे  याचा सत्कार करण्यात आला. तर भारतीय स्टेट बँक तेर शाखेचे व्यवस्थापक  आचार्य निलांजन यांच्या हस्ते डॉ स्नेहल क्षिरसागर याचा सत्कर करण्यात आला तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम अंकुलगे यांनी केले.या वेळी विजय जगदाळे, कामधेनू देशमाने, भाग्यश्री भक्ते,पूजा चौहान ,अनिता जगदाळे,अनिता गुरव  उपस्थित होते


 
Top